Wed, Nov 21, 2018 19:23होमपेज › Vidarbha › गोंदियाकर गारठले; पारा ८ अंशांवर 

गोंदियाकर गारठले; पारा ८ अंशांवर 

Published On: Jan 06 2018 6:48PM | Last Updated: Jan 06 2018 6:48PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी

थंडीच्या कडाक्याने गोंदियाकर शनिवारी चांगलेच गारठले. राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली असून तब्बल आठ अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. विदर्भात बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० अंशांच्या घरात नोंदविले गेले. नागपूर १०.२, चंद्रपूर १०.८, मुंबई १५.७, पुणे १३, रत्नागिरी १७.९, नगर १२, जळगाव ९.२, कोल्हापूर १६.८, महाबळेश्‍वर १३.२, नाशिक ८.८, सांगली १४.५, सातारा १३.४, सोलापूर १४.५, औरंगाबाद १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाने नमूद केले. राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला तरीदेखील उत्तर भारतात थंडीचा कडाका शनिवारी देखील कायम होता. दरम्यान, पुढील २-३ दिवस विदर्भ वगळता राज्यातील थंडी कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.