Tue, Oct 24, 2017 16:55होमपेज › Vidarbha › सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून घेऊन आत्‍महत्‍या

सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून घेऊन आत्‍महत्‍या

Published On: Jul 17 2017 5:25PM | Last Updated: Jul 17 2017 5:25PM

बुकमार्क करा

गडचिरोली : पुढारी ऑनलाइन वृत्त

भामरागड तालुक्‍यातील ताडगाव पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये केंद्रीय राखीव दलाचा जवान व्‍ही. हनुमंत यांनी स्‍वत:वर गोळी झाडून घेऊन आत्‍महत्‍या केली. ते सीआरपीएफच्या नऊ नंबरच्या बटालियनमध्ये कार्यरत होता. ताडगाव पोलीस स्‍थानक परिसरात ही आत्‍महत्‍या केल्याची घटना घडली. 

व्‍ही. हनुमंत यांनी दुसर्‍या जवानांच्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडून घेऊन आत्‍महत्‍या केली. जवानाच्या आत्‍महत्‍येचं कारण समजू शकले नाही. जवानाच्या आत्‍महत्‍येची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.