Fri, Mar 22, 2019 05:54
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › चंद्रपूरमध्ये ६४ जणांना शिळया मटणातून विषबाधा

चंद्रपूरमध्ये ६४ जणांना शिळया मटणातून विषबाधा

Published On: Apr 25 2018 11:31PM | Last Updated: Apr 25 2018 11:31PMपुणे : प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील चिंचोली येथे एका लग्नाच्या कार्यात शिळे मटण खाल्याने ६४ जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. 

 येथील आरोग्य विभागातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार १७३३ लोकसंख्या असलेल्या या गावात २२ एप्रिलला लग्नाचा कार्यक्रम होता. यामध्ये उपस्थितांना चिकन आणि मटन याचे जेवण ठेवले होते. याच दिवशी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत नागरिकांनी जेवण केले. त्यामध्ये ज्यांनी - ज्यांनी मटण खाल्ले त्यांनाच विषबाधा झाल्याचे आढळून आले. यानंतर त्यांना जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील विषबाधा झालेल्या ६४ रुग्णांपैकी ५३ रुग्णांना ऍडमिट करण्यात आले आहे तर ११ रुग्णांना बाहयरुग्ण विभागात उपचार घेउन त्यांना सोडण्यात आले असल्याची माहीती येथील जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली. 

 या विषबाधेची माहिती मिळताच येथील आरोग्य विभागाने ११ सरकारी विहीरी व सहा हातपंप या पाणीस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात आले. तसेच याचा अहवाल पुणे साथरोग विभागाला पाठविण्यात आला आहे. 

शिळे मटण खाल्याने विषबाधा

आधल्या दिवसाची शिळ्या मटणाची भाजी दुस-या दिवशी परत गरम करून खाल्याने त्यातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून शिळ्या मटणाची भाजी खावू नये, असे अवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  

Tags :chandrapur, food poisoning, pune, marriage