Sat, Aug 24, 2019 00:16होमपेज › Vidarbha › मुलीवर अत्याचार करणार्‍या बापास आजन्म कारावास

मुलीवर अत्याचार करणार्‍या बापास आजन्म कारावास

Published On: Sep 02 2018 8:17PM | Last Updated: Sep 02 2018 8:17PMनागपूर : प्रतिनिधी 

पोटच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम बापास भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल, शनिवारी (१ सष्टेंबर) रोजी आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. इब्राहीम करीम शेख (रा. कोसरा ता. पवनी) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, १० ऑक्टोबर २०१६ रोजी पीडित मुलीची आई ग्रामपंचायत कोसरा येथे बैठकीसाठी तर वडील इब्राहीम शेख हा शेतावर औषधी फवारणीसाठी गेला होता. यावेळी मुलगी घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास इब्राहीम घरी आला व मुलीला जेवण देण्यास सांगितले. मुलीने जेवण दिले व ती खोलीत जाऊन झोपी गेली. याचवेळी नराधम इब्राहीम शेख याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. घटनेच्या दोन दिवसानंतर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. यावेळी या पीडित मुलगीच्या आईने तत्काळ अड्याळ पोलिस ठाण्यात इब्राहीम शेख याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी इब्राहीम विरुद्ध कलम ३७६ (१) (२) (फ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिसांनी या घटनेचा तपास करून साक्षपुरावे गोळा करत हे पुरावे भंडारा न्यायालयात दाखल केले. अतिरिेक्त सत्र न्यायाधीश सचिन भंसाली यांनी आरोपी इब्राहीम शेख याला कलम ३७६ (१) (२) (फ) अन्वये आजन्म कारावास व पीडित मुलीला २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच कलम ५०६ अन्वये ६ महिने कारावास १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.