Fri, Feb 22, 2019 23:57होमपेज › Vidarbha › पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, २२ जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, २२ जणांना चावा

Published On: Feb 06 2018 3:26PM | Last Updated: Feb 06 2018 3:36PMभंडारा : पुढारी ऑनलाईन

भंडारा जिल्‍ह्यातील लाखांदूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तब्‍बल २२ जणांचा चावा या कुत्र्याने घेतला. त्यामुळे याठिकाणी कुत्र्याची दहशत पसरली असून पशुवैद्यकीय विभाग कुत्र्याच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहे. 

लाखांदूर येथे आज, मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या हल्‍ल्यात जखमींना तत्‍काळ उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कुत्र्याने त्या ठिकाणाहून पळ काढल्यामुळे पशुवैद्यकीय विभाग या कुत्र्याचा शोध घेत आहेत. 

महाराष्‍ट्रातील शहरांसह खेड्यातही भटक्या कुत्र्यांची समस्‍या सतावत असते. अशातच एखादे कुत्रे पिसाळल्यास परिसरातील लोकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागल्याचीही उदाहरणे आहेत.