Thu, Jan 24, 2019 07:40होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर सिन्हा यांचे आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर सिन्हा यांचे आंदोलन मागे

Published On: Dec 06 2017 8:03PM | Last Updated: Dec 06 2017 8:03PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गेले तीन दिवस सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेतले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सिन्हा यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर मागण्या मान्य होण्याचे आश्‍वासन मिळाल्याने आपण आंदोलन मागे घेत आहोत, असे सिन्हा यांनी सायंकाळी जाहीर केले.

शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरू होते. सोमवारी त्यांनी शेतकर्‍यांचा काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.