Fri, Sep 21, 2018 02:02होमपेज › Vidarbha › तीन वर्षांत सरकारला जनकल्याणाचं पोर झालं नाही : मुंडे 

तीन वर्षांत सरकारला जनकल्याणाचं पोर झालं नाही : मुंडे 

Published On: Dec 12 2017 3:40PM | Last Updated: Dec 12 2017 3:40PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी 

सत्तेशी लग्न लागल्यानंतर तीन वर्षांत सरकारला जनकल्याणाचं पोर होत नाही, तर आम्हाला का दोष देता, असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज, राज्य सरकारला लगावला. राज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला सुरूवात झाली. यात धनंजय मुंडे यांनी सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केले. 

सत्ताधारी पक्ष सातत्याने तुम्ही पंधरा वर्षे सत्तेत असताना काय केले असा प्रश्न उपस्थित करत आहेत, असे सांगून मुंडे म्हणाले, 'सत्ताधारी नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सातत्याने लक्ष्य करत  आहेत. पण, राज्यातील जनतेने सत्तेशी त्यांचं लगीन लावून देऊन, तीन वर्षे झाली. पण, सत्तेवर आलेल्या सरकारला जनकल्याणाचं पोर काही झालेलं नाही. यात आमचा काय दोष?' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारायचा आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. 

मोर्चामध्ये काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आहे. . काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी  (कवाडे गट) या पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून या पक्षांचे  हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले आहेत.