Thu, Apr 25, 2019 21:31होमपेज › Vidarbha › विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले

‘विरोधकांनी सत्तेवर असताना फक्त तिजोर्‍यांचे सिंचन केले’

Published On: Dec 18 2017 2:45AM | Last Updated: Dec 18 2017 1:57AM

बुकमार्क करा

अकोला : वृत्तसंस्था

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले.परंतु, मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन केले, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते गांधीग्राम येथे आयोजित समारंभात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 11 सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला, त्या वेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल 20 हजार कोटींची गरज होती. 

या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर नितीन गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला, म्हणून हा निधी उपलब्ध होऊ शकला. या निधीचा पूर्ण विनियोग करून सिंचनाची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.