Fri, Jul 19, 2019 01:15होमपेज › Vidarbha › आमदार बच्चू कडूंसह पाच जणांवर हाफमर्डरचा गुन्हा

आमदार बच्चू कडूंसह पाच जणांवर हाफमर्डरचा गुन्हा

Published On: Feb 11 2018 6:56PM | Last Updated: Feb 11 2018 6:56PM
नागपूर : प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात आसेगाव पोलिसांत तक्रार दाखल केल्याने आ. कडू समर्थकांनी चांदूरबाजारचे शिक्षण सभापती गोपाल तिरमारे यांच्यावर धारदार अवजाराने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास चांदूर बाजारातील माळीपुरा ते किसान चौक मार्गावर घडली. याप्रकरणी जखमी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आ. कडू यांच्यासह पाच जणांविरुद्ध 307 कलमांन्वये हाफमर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास चांदूरबाजार पोलिस करत आहे.