नागपूर : १० हजारांहून अधिकांना निवाऱ्याची सोय

Last Updated: Mar 30 2020 9:25AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


नागपूर : विशेष प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात १२१ निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आली आहेत. या निवारागृहात १० हजार ३३९ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

लॉकडाऊनच्या  कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच  परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिल्या आहेत, यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी  आज  अडकलेल्या आणि बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत, 

वाचा - नाशिक : गाडी पुलावर आदळून मायलेकाचा मृत्यू

विभागात नागपूर - ७३ निवारागृहे ( ८ हजार १७९ नागरिकांची सुविधा),  वर्धा जिल्हा - ७ निवारागृहे ( २४० नागरिक) भंडारा जिल्हा- ९ ( ५७ नागरिक) गोंदिया जिल्हा- ८ (८३६ नागरिक)  चंद्रपूर जिल्हा - १६ ( ६५२ नागरिक), गडचिरोली जिल्हा - ९ ( ३७५ नागरिक) अशा पध्दतीने एकूण १० हजार ३३९  विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन,  पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती संजय कुमार यांनी दिली.

वाचा - गोवा : राज्यात दोन नवे ‘कोरोना’बाधित

जमावबंदी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार आणि नागरिकांनी  सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापिताच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही कुमार यांनी सांगितले आहे.articleId: "185579", img: "Article image URL", tags: "corona virus, shelter home, nagpur division, peoples , डॉ. संजीव कुमार , लॉकडाऊन, जमावबंदी , नागपूर , निवारागृहे , कोरोना",