Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Vidarbha › शरद पवारांमुळेच शेतकरी संकटात : आप

शरद पवारांमुळेच शेतकरी संकटात : आप

Published On: Jan 22 2018 7:40AM | Last Updated: Jan 22 2018 7:40AMनागपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. शरद पवार या देशाचे कृषिमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, तरीही त्यांनी राज्यातील शेतकर्‍याकडे दुर्लक्षच केले. असा घणाघाती आरोप आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अकोला येथे बोलताना केला.

सावंत म्हणाले, शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना आणि मुख्यमंत्री असताना शेती उत्पादित मालाला हमीभाव देण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी न करता पवार यांनी शेतकर्‍यांना संकटात ढकलले. ब्रिगेडियर सावंत माध्यमांशी बोलत होते.