Wed, Jan 23, 2019 04:25होमपेज › Vidarbha › अयोध्येमधील वादग्रस्‍त जागेवर बौध्दांचा दावा

अयोध्येमधील वादग्रस्‍त जागेवर बौध्दांचा दावा

Published On: Mar 22 2018 8:14AM | Last Updated: Mar 22 2018 8:14AMनागपूर : पुढारी ऑनलाईन

आयोध्येमधील राम मंदिराचा वाद चालू असतानाच आता या जागेवर बौध्द समुदायांनी आपला दावा केला आहे. आयोध्येमधील मंदिराची जागा ही बौध्दांच्या मालकीची असून खोदकाम केल्यास या ठिकाणी केवळ बौध्दांचे अवशेष सापडतील असा दावा भदंत आर्य नागार्जुन ससाई, डॉ. भाऊ लोखंडे, रणजीत मेश्राम यांनी केला आहे. 

या जागेबाबत काशी-बनारस विद्यापीठाचे संस्कृत पंडीत डॉ. जगन्नाथ उपाध्याय यांनीही दावा केला आहे. याआधीही अनेक संशोधकांनी अयोध्येमध्ये बौध्द स्मारक असल्याचे स्‍पष्ट केले आहे. मात्र या संशोधनाके दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे मत मांडण्यात आले आहे. 

आयोध्येमधील वादग्रस्‍त जागेबाबत माईसाहेब शारदा कबीर यांच्याकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेकडे जाणीवरपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचेही म्‍हटले आहे. या वादग्रस्‍त जागेचा वाद वाढवायाचा नाही मात्र याबाबत दाखल केलेल्या याचिका, झालेल्या संशोधनाकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये असे ससाई यांनी स्‍पष्ट केले आहे.