Thu, Jul 02, 2020 23:32होमपेज › Vidarbha › अकोल्यात मंगळवारी २२ नवे पॉझिटिव्ह; रूग्ण संख्या ६२७ वर

अकोल्यात मंगळवारी २२ नवे पॉझिटिव्ह; रूग्ण संख्या ६२७ वर

Last Updated: Jun 02 2020 11:59AM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

अकोल्यात मंगळवारी सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे ४८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २६ अहवाल निगेटिव्ह तर २२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अकोला जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दिड ते दोन महिन्याच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग अकोल्यात झपाट्याने वाढला असून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ६२७ एवढी झाली आहे.

अवघ्या ६० दिवसात रूग्ण संख्या सहाशेच्या पार पोहोचली आहे. प्रत्येक महिन्यात १०० नवे रूग्ण अकोल्यात आढळले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६२७ झाली आहे. या पैकी ३४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर प्रत्यक्षात १५१ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि २) प्राप्त अहवालात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. रजपुतपुरा येथील ३,  सिंधी कॅम्प येथिल २, माळीपुरा येथील २,  अशोकनगर अकोट फैल येथील २  तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ,  आंबेडकरनगर,  शिवसेना वसाहत,  जुने तारफैल,  आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी,  रुद्रनगर, जुनी उमरी नाका,  खदान,  पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.