Thu, Apr 25, 2019 23:40होमपेज › Vidarbha › काय? एका व्यक्तीचे दोन वेगवेगळे रक्तगट!

काय? एका व्यक्तीचे दोन वेगवेगळे रक्तगट!

Published On: Dec 26 2017 9:20PM | Last Updated: Dec 26 2017 9:14PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

एका व्यक्तीचे दोन वेगवेगळे रक्तगट असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. हे वाचून अनेकांना धक्का बसला असेल पण हे एक सत्य असून हा प्रकार पॅथालॉजिच्या भोंगळ कारभारामुळे घडला आहे.

वेळेकर नगर मानेवाडा रोड येथे राहणारे होमेश्वर भुजाडे हे एक शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या परिवाराचे हेल्थ इन्शुरन्स केले असून, त्याअनुषंगाने कंपनीच्या वतीने त्यांची दर वर्षी कुटुंबासह रक्त व शुगर तपासणी केली जाते. त्यानुसार रविवारी त्यांनी आपुलकी पॅथालॉजी लॅबोरॅटरी येथे तपासणी करून घेतली आणि त्यात विविध टेस्ट त्यांनी करून घेतल्या. या टेस्टचा रिपोर्ट त्यांना काल सोमवारला मिळाला. या वेळी त्यांनी रिपोर्ट पाहिला असता त्यांना चांगलाच धक्का बसला. या रिपोर्ट मध्ये त्यांचा रक्तगट हा ङ्गबी आरएच पॉझीटीव्हीफ असा दाखवण्यात आला. 

गेल्या वर्षी त्यांनी मातोश्री डायग्नोस्टिक सेंटर येथे तपासणी केली असता त्यावेळी त्यांचा रक्तगट बी आरएच निगेटिव्ह असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे होमेश्वर हे संभ्रमात पडले. आणि त्यांनी आपले जुने कागदपत्र तपासले असता जुन्या एका रिपोर्ट मध्ये त्यांचा रक्तगट बी आरएच निगेटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. होमेश्वर हे शिक्षक असल्याने त्यांना हा प्रकार लगेच लक्षात आला. डॉक्टर रक्तगटाच्या आधारावरच पुढील उपचार करीत असतात त्यामुळे जर का असा भोंगळ कारभार होत असेल तर व्यक्तीच्या जीवर ते बेतू शकत. त्यामुळे असा भोंगळ कारभार करणार्‍या पॅथालॉजीवर आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

पॅथालॉजी च्या कारभाराने एका माणसाचे दोन वेगवेगळे रक्तगट असून, शकतात हे तर सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या घटनेकडे गांभीर्याने बघून काळजी घेणे आवश्यक आहे.