Sun, Jul 05, 2020 23:21होमपेज › Vidarbha › यवतमाळ : विजेचा खांब ट्रॅक्टरवर पडल्याने तरुणाचा मृत्यू

यवतमाळ : विजेचा खांब ट्रॅक्टरवर पडल्याने तरुणाचा मृत्यू

Last Updated: Jun 05 2020 7:47PM
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

पोफाळी पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कळमुला शिवारात २२ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. ट्रॅक्टर घेऊन मशागतीसाठी शेतात गेल्यावर शेतामधील विजेचा खांब डोक्यात पडून या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. 

कळमुला येथील विठ्ठल आनंदराव कनवाळे यांच्या शेतात, गावातील विशाल अजब जाधव हा आपल्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन शेतात मशागतीकरीता गेला होता. यावेळी विजेचा खांबाला ट्रॅक्टर लागल्यामुळे विजेचा खांब ट्रॅक्टर वर पडला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या विशाल जाधव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उमरखेड येथे शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.