Sun, Jan 20, 2019 14:32होमपेज › Vidarbha › आमदार निवासात महिला आमदार सुरक्षित नाहीत

आमदार निवासात महिला आमदार सुरक्षित नाहीत

Published On: Dec 23 2017 11:21AM | Last Updated: Dec 23 2017 11:21AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सुरक्षित समजल्या जाणार्‍या आमदार निवासातही महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे सरकार कुणालाच संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. नागपूरच्या आमदार निवासात रूम नंबर 214 मध्ये राहिलेल्या काँग्रेस आमदार दीपिका चव्हाण, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आणि अपक्ष आमदार ज्योती कलानी यांना काही लोकांनी रात्री त्रास दिला असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केली आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था काय आहे, सुरक्षित आमदार निवासात हा प्रकार कसा घडतो, असा सवालही उपस्थित केला.