Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Vidarbha › हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरला मुंबईत

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरला मुंबईत

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:11AMनागपूर : 

4 जुलैपासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. पुढील हिवाळी अधिवेशन आता 19 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत 21 विधेयके मंजूर झाली. यावेळी मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आणि तीन आठवडे घेण्यात आले. मात्र विदर्भात अधिवेशन होत असतानाही नाणार प्रकल्प, शिवस्मारकाची उंची, नवी मुंबईतील सिडकोच्या जमिनीचा कथित घोटाळा आणि आमदारांच्या हक्कभंगाच्या प्रकरणांमुळे हे अधिवेशन गाजले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ, मराठवाड्यासाठी सुमारे 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून विदर्भवासीयांना खूश केले. 

अधिवेशनात कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्यात आली. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मेगाभरतीत 16 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. दूध उत्पादक शेतकर्‍यांना दर देण्यासाठी दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना दुधासाठी 25 रुपये दर मिळू शकणार आहे. शिवसेनेच्या पदरी मात्र फारसे काही पडले नाही.