होमपेज › Vidarbha › अमरावती : कोरोना संकटात तीव्र पाणीटंचाई 

अमरावती : कोरोना संकटात तीव्र पाणीटंचाई 

Last Updated: May 28 2020 9:53AM

पाण्यासाठी पायपीठ करणारे नागरिकअमरावती : पुढारी ऑनलाईन 

एकीकडे राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, अकोला जिल्ह्यात सुर्याने आग ओकायला सुरूवात केली आहे. अजून मे महिना संपायचा असताना येथे तापमान ४० डिग्रीच्या वर गेले आहे. लोकांच्या अंगाची लाही लाही होत असताना आता पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. यामुळे कोरोनाच्या संकंटात अमरावती जिल्ह्यातील लोकांच्यावर पाणीटंचाई चे संकट आले आहे. अमरावतीकरांना पाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. 

अमरावतीत तीन महिन्याच्या चिमुकलीला कोरोना 

विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी अनेकांना मैलांच्या पायवाटा तुटवाव्या लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. तर विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या संकटाच्या बाबतीत दयनीय परिस्थिती असते. 

अमरावती : पाच वर्षीय बालिकेसह परिचारिकेला कोरोना

याबाबतीत मेळघाट व लगतच्या परिसरातील ग्रामस्थांचा असा दावा आहे की, त्यांना तीव्र पाण्याचे संकटाला तोंड द्यावे लागत आहे. तर पाणी आणण्यासाठी खडकाळ प्रदेशात मैलांचे अंतर पायी जावे लागत आहे. तसेच त्यांनी आपल्या व्यथा मांडताना, "पाणी आणण्यास संपूर्ण दिवस लागतो. अस्वच्छ पाणी पिल्याने आम्ही आजारी पडतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारला विनंती असून यावर लवकर उपाययोजना करा" अशी विनवणी केली आहे.