Fri, Jul 19, 2019 05:48होमपेज › Vidarbha › सांडपाणी प्रक्रिया करून चंद्रभागेत सोडणार!

सांडपाणी प्रक्रिया करून चंद्रभागेत सोडणार!

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 14 2018 12:57AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने चंद्रभागा नदी शुध्द करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले असून या प्रयत्नाचा एक भाग म्हणुन पुणे ते पंढरपूरलगतच्या सर्व शहरांमधील सांडपाणी यापुढे प्रक्रिया करून चंद्रभागा नदीमध्ये सोडले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्य डॉ. निलम गोर्‍हे यांनी पंढरपुमध्ये येणार्‍या भाविकांच्या समस्येबाबत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागतो. भाविकांसाठी तेथे आवश्कतेनुसार स्वच्छतागृहे नाहीत. शहरामधील सांडपाणीसुध्दा चंद्रभागेतच सोडले जात असल्यामुळे अशा दुर्गंधीयुक्त पाण्याने भाविकांना अंघोळ करावी लागते. काही भाविक शुध्द पाण्यासाठी नदी परिसरात खड्डे खोदतात. ते खड्डे पाण्याने भरल्यानंतर भाविकांना दिसत नाहीत. अनेकजण त्यामध्ये पडुन जाऊन जखमी होतात. त्यामुळे पंढरपुर शहर व चंद्रभागेच्या शुध्दतेकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपुर शहराची सध्या 94 हजार लोकसंख्या आहे. त्यानुसार शहराला 16 एमएगडी पाणी सोडले जाते. यात्रेदरम्यान 19 एमएलडी पाणी उपलब्ध केले जाते. शहरातील 8 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करुन चंद्रभागेत सोडले जात, पण भविष्यात जादा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. प्रक्रिया केलेले पाणी भुयारी गटारांमधून चंद्रभागेत सोडले जाणार असून सांडपाणी प्रक्रियेसाठी 59.75 कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे. नदीपरीसरातील खड्डे बुजविण्याबाबत नगरपालिका कार्यवाही करील. तसेच नगरपालिकेसोबतच पंढरपुरमध्ये खाजगी व्यवस्था निर्माण केली आहे. सरकारने भाविकांना दर्शन सुलभ होईल याची काळजी घेतली असून येत्या 24 महिन्यांत पंढरपुरचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.