Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Vidarbha › मुंडेंच्या आरोपाला, तावडेंचे प्रत्युत्तर

मुंडेंच्या आरोपाला, तावडेंचे प्रत्युत्तर

Published On: Dec 15 2017 7:36AM | Last Updated: Dec 15 2017 7:36AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी सभागृहाबाहेर विधान परिषदेतील पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्‍नांच्या अनुशंगाने शिक्षणमंत्री आणि सत्ताधार्‍यांवर आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला. तर शिक्षणमंत्री तावडे यांनी हा आरोप फेटाळून लावले.

धनंजय मुंडे यांनीसरकारच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील 1300 शाळा बंद झाल्या आहेत. विना अनुदानित संस्थांना अनुदान देण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही. राज्यात शिक्षणाची दुरवस्था झाली असून त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी राज्यसरकारवर आरक्षणविरोधी असल्याचा आरोप केला. यानंतर सभागृहाबाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री तावडे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने शिक्षणाची दुरवस्था करून ठेवली आहे. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न भाजप -शिवसेना सरकार करीत असून अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले.