Mon, Mar 25, 2019 05:29
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › मी सरकारचा नायनाट करणारे औषध : विखे

मी सरकारचा नायनाट करणारे औषध : विखे

Published On: Dec 13 2017 1:17PM | Last Updated: Dec 13 2017 1:17PM

बुकमार्क करा


नागपूर : प्रतिनिधी

होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे चोख प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. विखे-पाटील हे विषारी औषध असल्याचे प्रसिद्धीपत्रक सोमवारी शिवसेनेने काढले होते. त्याला उत्तर देताना विखे-पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की, भाजप आणि उद्धव ठाकरे, हे दोघेच या सरकारचे खरे लाभार्थी असल्याचे विधान मी केले होते. सत्य हे कटू असते आणि ते उद्धव ठाकरेंना खुपल्यामुळे त्यांनी मला विषारी औषधाची उपमा दिली आहे. परंतु, ही टीका म्हणजे माझ्या कामाची पावती आहे.