Thu, Feb 21, 2019 15:15होमपेज › Vidarbha › विदर्भ एक्‍स्‍प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्‍वे कुरूम स्‍थानकात थांबवली

विदर्भ एक्‍स्‍प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्‍वे कुरूम स्‍थानकात थांबवली

Published On: Jun 18 2018 8:53AM | Last Updated: Jun 18 2018 8:53AMअकोला : पुढारी ऑनलाईन

विदर्भ एक्‍स्‍प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यने सोमवारी सकाळी दोन तास रेल्‍वे खोळंबून राहिली. नागपूरकडे जात असणार्‍या रेल्‍वेमध्ये कुरूम स्‍थानकामध्ये बिघाड झाला. विदर्भ एक्‍स्‍प्रेस रेल्‍वे स्‍थानकात थांबून असल्याने इतर रेल्‍वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.

या घटनेमुळे रेल्‍वे प्रशासन व कर्मचार्‍यांच्या धावपळ उडाली आहे. वेळापत्रकात बिघाड झाल्याने प्रवाशांमधून संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे.