Mon, Jan 21, 2019 09:00होमपेज › Vidarbha › ‘मनरेगा’त खादी उद्योगाला जोडावे : उपराष्ट्रपतींची सूचना

‘मनरेगा’त खादी उद्योगाला जोडावे : उपराष्ट्रपतींची सूचना

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:34PMनागपूर : प्रतिनिधी

महात्मा गांधी रोजगार योजनेत (मनरेगा) खादी उद्योगालाही जोडावे, अशी सूचना आपण पंतप्रधानांना करू, अशी घोषणा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे बोलताना केली. वैद्यक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी सन्मान प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

आज आपल्या राजकीय कारर्कीदीला 40 वर्षे पूर्ण झाली असून आजच्याच दिवशी सेवाग्रामच्या बापूकुटीला आणि महात्मा गांधीजींच्या विचाराने आणि अस्तित्वाने पावन झालेल्या या परिसराला भेट देताना विशेष आनंद होत असल्याचे उपराष्ट्रपतींनी यावेळी स्पष्ट केले.