Sat, Jul 20, 2019 03:01होमपेज › Vidarbha › दोन वर्षांनंतर भुजबळांची तोफ विधानसभेत धडाडली

दोन वर्षांनंतर भुजबळांची तोफ विधानसभेत धडाडली

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 10 2018 1:04AMनागपूर :

तब्बल दोन वर्षांनंतर सोमवारी छगन भुजबळ यांची तोफ विधानसभेत धडाडली. सन 2018-19च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत भुजबळ यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भुजबळ यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी रंगली. तू तू -मैं मैं झाली. अखेर सदस्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. वैद्यकीय प्रवेशातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ यांना संधी मिळाली नाही.

पण, पुरवणी मागण्यांवर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, गावागावात वीज पोचवू असे आश्वासन सरकारने दिले असले तरी राज्यातील अनेक गावांमध्ये वीज नाही. दुसरीकडे रिलायन्स एनर्जी कंपनीने दोन हजार कोटी रुपये कर थकवला असतानाही दोन वर्ष झाली तरी रिलायन्सने थकीत कराचा एक रुपयाही भरला नाही.