हिंगोलीत आणखीन दोघांना कोरोनाची लागण 

Last Updated: Jun 01 2020 8:01PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


हिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

मुंबई येथून आलेल्या व सद्यस्थितीत औंढा येथील  कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १७ वर्षीय तरूणास व वसमत येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या १२ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा १८२ वर गेला असून १०५ रूग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत ७७ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.