यवतमाळ : वृत्तसंस्था
निवडणुकीचे कामकाज करण्यास नकार दिल्या प्रकरणी जिल्ह्यात २७ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यात निवडणुकीच्या कामांमध्ये मतदारांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ते करण्यास काही शिक्षकांनी थेट नकार दिल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील कळंब, बाहुलगाव, राळेगाव तहसील येथून शिक्षकांविषयी तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्या त्या पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकांची बुथ लेव्हल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १५ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबर पर्यंत हे काम करायचे होते. पण, हे शैक्षणिक काम नाही, असे सांगत काही शिक्षकांनी ते करण्यास नकार दिला.