Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Vidarbha › तुकाराम महाराजांचा खून; आव्हाडांच्या वक्‍तव्याने वादंग 

तुकाराम महाराजांचा खून; आव्हाडांच्या वक्‍तव्याने वादंग 

Published On: Jul 13 2018 12:52AM | Last Updated: Jul 13 2018 12:24AMनागपूर ः वृत्तसंस्था

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असे वक्‍तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हदरम्यान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांनी आपले वक्‍तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र, त्यांच्या या वक्‍तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध नोंदवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तुकाराम महाराजांबाबत असे बोलण्याचे धाडस त्यांनी केलेच कसे? त्यांच्या या वक्‍तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाने नोंदवल्या आहेत.

मनु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्‍वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्‍तव्य काही दिवसांपूर्वी शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्त्री उपभोगाची वस्तू आहे असे म्हणणारा मनू, जात व्यवस्था घट्ट करणारा मनू होता. तो तुकाराम महाराजांपेक्षा आणि ज्ञानेश्‍वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे? संभाजी भिडे यांचे डोके फिरले आहे असे मी म्हणणारच नाही. महाराष्ट्रात मनुचा पुनर्जन्म होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र, त्याचवेळी तुकाराम महाराजांचा उल्‍लेख एकेरी केला. तसेच आव्हाड यांनी संत चोखा मेळा यांच्या जातीचा उल्‍लेख केला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, असेही वारकरी संप्रदायाने म्हटले आहे.