Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Vidarbha › कोकणात जाणार्‍या गणेशभक्‍तांना टोलमाफी

कोकणात जाणार्‍या गणेशभक्‍तांना टोलमाफी

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 20 2018 12:38AMनागपुर : विशेष प्रतिनिधी

मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल ते झाराप रस्ता मे 2019 अखेर पुर्ण होईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली. तसेच गणेशोत्वासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना पाटील बोलत होते. मुंबई- गोवा महामार्गाची चाळण झाली असून खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. कोकणवासीयांना 1 ते 3 फुट खोल खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुटीच्या दिवशी वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे प्रवासासाठी नाहक वेळ वाया जात आहे. याविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर संबधीत कामाचा ठेकेदार बदलला असला तरी कामाने अद्यापही गती घेतलेली नाही. संथगतीने सुरु असलेल्या कामाचा कोकणवासीयांना फटका बसत असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 

त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील म्हणाले, सध्या या महामार्गाच्या कामासाठी दहा कंत्राटदार नियुक्त केले आहेत. कशेडी घाटातील कामाचेही लवकरच टेंडर काढले जाणार असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काम वेगाने सुरु होईल. येत्या 15 ऑगस्टपर्यंत रस्ता सुस्थितीत आणला जाईल. या महामार्गाच्या कामावर राज्यासह केंद्र सरकारचेही लक्ष आहे.