Tue, Nov 19, 2019 13:47होमपेज › Vidarbha › चंद्रपूर : वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू

Published On: Jul 08 2019 12:26PM | Last Updated: Jul 08 2019 12:25PM
चंद्रपूर : पुढारी ऑनलाईन

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ एका वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. आज, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मेटेपार गावालगत वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत दोन बछडे साधारण आठ ते नऊ महिन्यांचे आहेत. त्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना कळविली आहे.