Tue, Jul 16, 2019 11:43होमपेज › Vidarbha › ताडोबात वाघ, अस्वल झुंज 

ताडोबात वाघ, अस्वल झुंज 

Published On: Mar 01 2018 9:48PM | Last Updated: Mar 01 2018 9:47PMनागपूर : प्रतिनिधी 

ताडोबाच्या अभयारण्यात प्राण्यांची पुन्हा एक लीला पर्यटकांना बघायला मिळाली. बफर झोनमधील देवाडा तलावावर वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले होते. त्यानंतर जे घडले ते सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे होते.

ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमधील देवाडा तलावावर बुधवारी वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले होते. मग काय, हे एकमेकांचे जानीदुश्मन लढाई करू लागले. पण, आश्चर्य म्हणजे जंगलाच्या राजाने माघार घेतली आणि पाण्यात पडला. तर, अस्वल शिरजोर झाले. 

वाघाचे वय जेमतेम 2 ते 3 वर्ष असावे. त्यामुळे त्याने माघार घेतली आणि त्यानंतर अस्वल तेथून पळून गेले. एकप्रकारे, अस्वलाने वाघाला पाण्यात ढकलून जणू होळीच साजरी केली.