Fri, Jul 19, 2019 07:34होमपेज › Vidarbha › गारपिटीमुळे 460 पोपटांचा दुर्दैवी मृत्यू

गारपिटीमुळे 460 पोपटांचा दुर्दैवी मृत्यू

Published On: Feb 17 2018 2:09AM | Last Updated: Feb 15 2018 10:20PM नागपूर : प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 460 पोपटांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळील पिंपळाच्या झाडांवर हजारो पोपटांचे वास्तव्य होते.

वर्षानुवर्षे निर्भयपणे जगणार्‍या या पोपटांनी बरेच उन्हाळे पावसाळे सहज झेलले होते. अधूनमधून झालेल्या गारपिटींनाही निर्भयपणे लढा दिला. मात्र, मंगळवारी झालेली तुफान गारपीट त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरली. लिंबाच्या आकाराएवढ्या या गारांच्या माराने झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले. यापैकी 460 पोपटांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

या सर्व पोपटांना वन विभागामार्फत जमिनीत पुरण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोपटांचा मृत्यू झाल्याने परिसरातील लोक हळहळ व्यक्‍त करत आहेत.