Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Vidarbha › जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेची हत्या

जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेची हत्या

Published On: Aug 27 2018 9:00PM | Last Updated: Aug 27 2018 8:50PMनागपूर : प्रतिनिधी

जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन एका युवकाने महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे ही घटना घडली. पाली गुंडरु मडावी (वय -४२) असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सरजू बुकलू बोगामी (वय-२४) यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाली मडावी ही महिला जादुटोणा करते, असा सरजूला संशय होता. त्यामुळे सुरजने पालीला मारण्याचा कट रचला होता. पाली ह्या आपल्या शेतावर गेल्या होत्या. याचवेळी सुरजने संध्याकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने पाली यांची हत्या केली. लाहेरी पोलिसांनी आरोपी सरजू बोगामी याच्यावर भादंवि कलम 302 अन्वये गुन्हादाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.