नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमधील बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी या दुहेरी हत्याकांडाला आता नवे वळण मिळाले आहे. हे दुहेरी हत्याकांड नरबळीचा प्रकार असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. याबाबतचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
17 फेब्रुवारीला दीड वर्षीय राशी कांबळे आणि उषा कांबळे या दोघींची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याचा नातेवाईक असलेल्या इतर आरोपींनी दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून नाल्यात फेकले होते. सर्वत्र खळबळ उडवणार्या या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी दुसर्या दिवशी मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया यांना अटक केली होती. त्यासोबतच त्यांच्या एका 17 वर्षीय नातेवाईकालाही ताब्यात घेण्यात आले होते.
महिनाभराने मुख्य आरोपीचा भाऊ अंकीत शाहूला अटक करण्यात आली. आरोपी अंकीतची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या सांगण्यावरून घरातील काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. चिमुकल्या राशीचे रक्ताने माखलेले कपडे, हळदी, कुंकू आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले. सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी हा नरबळीचा प्रकार असल्याचे सांगितले. पत्रकार रविकांत यांची मुलगी राशी पायाळू होती. शिवाय ही घटना अमावस्येच्या दिवशी घडल्यानेही, नरबळीची शक्यता आहे, असेही तेलगोटे यांनी पत्रकारांना सांगितले.
या प्रकरणातील सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या घरातून पोलिसांनी राशीचे रक्ताने माखलेले कपडे, पूजेसाठी वापरलेले लाल कापड आणि हळदी-कुंकवासह अन्य साहित्य जप्त केले आहे. यावरुन राशी आणि उषा कांबळेची हत्या नरबळीचाच प्रकार असल्याचा निष्कर्ष काढल्याचे, सरकारी वकिल नितीन तेलगोटे यांनी सांगितले.
Tags : Nagpur, Nagpur news, black magic, journalist, mother daughter, murder,
May 05 2018 5:57PM
May 05 2018 1:34PM
May 05 2018 1:10PM
May 01 2018 8:43AM
Apr 30 2018 10:14PM
Apr 25 2018 11:31PM