Mon, Aug 19, 2019 05:38होमपेज › Vidarbha › मोदींचा खोटारडेपणा उघडकीस आणणार

मोदींचा खोटारडेपणा उघडकीस आणणार

Published On: Dec 09 2017 7:43PM | Last Updated: Dec 09 2017 7:43PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

आज भाजप सोडल्यावर मी कोणत्या पक्षात जाणार, हे ठरलेले नाही. मात्र, जनतेत जाऊन भाजपचा आणि नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा उघडकीस आणायचा, हे ठरलेले आहे. त्यासाठीच सोमवारी मी गुजरातमध्ये पोहोचत आहे. तिथे काँगे्रसच्या व्यासपीठावरून भाजपचा आणि नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा मी उघडकीस आणणार आहे, असा घणाघाती इशारा शुक्रवारी भाजपमधून बंड करून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 

शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवून रात्री उशिरा पटोले नागपुरात पोहोचले. दुपारी 12 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या खास वर्‍हाडी शैलीत पटोले यांनी शनिवारी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी आम्ही सत्तेत आल्यावर  लागू करू, असे पंतप्रधानांसह सर्व नेते वेळोवेळी प्रचारादरम्यान सांगत होते.

मात्र, सत्तेत येताच आम्ही या शिफारशी लागू करणार नाही, असे न्यायालयात सरकारतर्फे शपथपत्र देण्यात आले. याबाबत पंतप्रधानांच्या घरी झालेल्या बैठकीत मी विचारले असता मला दाटून चूप बसविण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.