Fri, Sep 21, 2018 04:19होमपेज › Vidarbha › आणखी 6 नक्षलींचा खात्मा

आणखी 6 नक्षलींचा खात्मा

Published On: Apr 24 2018 1:08AM | Last Updated: Apr 24 2018 12:52AMगडचिरोली : वृत्तसंस्था

48 तासांत दुसरी मोठी कारवाई करताना गडचिरोली पोलिसांनी आणखी 6 नक्षलवाद्यांचा सोमवारी रात्री खात्मा केला. यात नक्षलींचा कमांडर नंदूही ठार झाल्याचे वृत्त आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला जंगल परिसरात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. त्यामुळे ठार झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नक्षलवादविरोधी मोहिमेचे पोलिस महासंचालक शरद शेलार यांनी दिली. भामरागड परिसरात रविवारी 16 नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर सी-60 जवानांनी  दुसर्‍याच दिवशी मोठी कारवाई केल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. रविवारच्या कारवाईत साईनाथ आणि सिनू या दोन प्रमुख नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. 

Tags : Vidarbha, destruction, 6, more, naxalites