Wed, Aug 21, 2019 14:45होमपेज › Vidarbha › विधानसभेत नियमित कामकाजाला सुरुवात 

विधानसभेत नियमित कामकाजाला सुरुवात 

Published On: Dec 14 2017 1:48AM | Last Updated: Dec 14 2017 1:44AM

बुकमार्क करा

नागपूर : दिलीप सपाटे 

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सरकारविरोधात गेली दोन दिवस सभागृह आणि सभागृहाबाहेर हल्लाबोल करणार्‍या विरोधकांनी बुधवारी आपले ताबूत शांत केल्याने विधानसभेत कामकाजाला सुरुवात झाली. कापसावरील बोंडअळीच्या प्रश्‍नावर विरोधकांनी काहीकाळ कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्‍यांच्या चर्चेच्या प्रस्तावात बोंडअळीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी दाखविल्याने विरोधक नरम पडले.  

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई आणि कापसावरील बोंडअळी मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत विरोधकांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर काम बंद पाडले. मात्र, तिसर्‍या दिवशी विरोधक नरम पडले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच कर्जमाफीच्या प्रश्‍नावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. या गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब झाले.