होमपेज › Vidarbha › नागपूर : खासदार सुप्रिया सुळे यांना अटक

नागपूर : खासदार सुप्रिया सुळे यांना अटक

Published On: Dec 11 2017 2:13PM | Last Updated: Dec 11 2017 2:13PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना चक्का जाम आंदोलन करताना पोलिसांनी अटक केली. नागपूर विमानतळ रोडवर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली 'चक्का जाम आंदोलन 'केले. 

चक्का जाम आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी आणि हल्लाबोलच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी यावेळी पोलिसांनी सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.

नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पाश्वर्भूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नागपुरात आंदोलन करणार  आहेत.

वाचा संबंधित बातम्या :

आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ‘मूड’ आक्रमक

शरद पवार यांचे ३७ वर्षांनी नागपुरात आंदोलन 

आमदार आशिष देशमुख यांचा  मुख्यमंत्र्यांवर लेटरबॉम्ब 

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे: राधाकृष्ण विखे-पाटील