होमपेज › Vidarbha › कर्जाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Feb 27 2018 1:55AM | Last Updated: Feb 26 2018 9:00PMनागपूर : प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार वर्षांपासूनची सततची नापिकी आणि शेतमालाला भाव नसल्याने कुटुंबीयांवर आलेल्या आर्थिक संकटामुळे एका तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. दर्यापूर तालुक्यातील उमरी मंदिर येथील रवी माहूलकर असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून त्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी रवी माहूलकर यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती असून त्या जमिनीवर महाराष्ट्र बँकेचे शेतीकर्ज आहे.

तसेच त्यांनी काही खासगी कर्जही काढले होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीउत्पादन योग्य प्रमाणात होत नव्हते, त्यातच पिकवेलल्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जाची परतफेड करणे जिकिरीचे झाले होते.अखेर रवी माहूलकर यांनी रविवार आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. माहूलकर यांच्या मागे आई, वडील, पत्नी व एक मुलगी, असा परिवार आहे.