Sun, Feb 17, 2019 19:32होमपेज › Vidarbha › सुरेश धस-अमरसिंह पंडित यांच्यात जोरदार चकमक

सुरेश धस-अमरसिंह पंडित यांच्यात जोरदार चकमक

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 11:26PMनागपूर : चंदन शिरवाळे

भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमरसिंह पंडित यांच्यामध्ये बुधवारी भर सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर बोलताना धस यांनी पंडित यांच्या नेतृत्वाखालील विविध सहकारी संस्थांनी केलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवल्यावरून या दोघांमध्ये वाढत असलेली खडाजंगी पाहून उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाजाची वेळ संपल्याचे जाहीर केले.

अन्यथा सभागृहाचा आखाडा झाला असता. राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात विरोधी पक्षांच्या वतीने नियम 260 अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना पंडित यांनी सरकारच्या शेतकरी धोरणावर टीका केली. ते म्हणाले, शेतकर्‍यांसाठी सरकारने पीकविमा योजना लागू केली असली तरी विमा कंपनी विविध कारणे सांगून शेतकर्‍यांना विम्याची रक्‍कम देण्यास टाळाटाळ करीत आहे.