Wed, Jul 24, 2019 12:41होमपेज › Vidarbha › शालेय विद्यार्थी करणार वायू प्रदूषणाची पोल-खोल

शालेय विद्यार्थी करणार वायू प्रदूषणाची पोल-खोल

Published On: Feb 20 2018 11:12PM | Last Updated: Feb 20 2018 11:04PMनागपूर : प्रतिनिधी

वाढते वायू प्रदूषण चिंतेची बाब बनले आहे. यावर उपाय करण्याची गरज आहे पण काय करावे असा प्रश्न पडतो. यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास गेल्यावर्षी सुरुवात केली होती. यंदा झालेल्या कार्यक्रमात अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक विजय घुगे व शिकागो महाविद्यालयाच्या एनर्जी पॉलिसि इंस्टीट्युट यांनी संयुक्तपणे केले होते.

यावेळी घुगे म्हणाले की, तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती करणे गरजेचे आहे. पर्यावरण, विज्ञान केवळ गुणांपुरते न शिकवता त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा होईल हे पाहिले पाहिजे. स्टार रेटिंगसारखे कार्यक्रम यासाठी उपयोगी ठरतील.

काय आहे स्टार रेटिंग?

Image may contain: one or more people, people sitting and indoor

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा (MPCB) स्टार रेटींग हा भारतातील पहिलाच कार्यक्रम आहे.यामध्ये अंदाजे 20,000 औद्योगिक वायु उत्सर्जनाच्या नमुन्यांची माहीती सहज उपलब्ध होऊ शकते. विविध संशोधन तज्ञ आणि क्षेत्रातील नामांकीतांना सोबत घेवुन MPCB  ने केलेले हे व्यापक कार्य आता प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या नवीन योजनेंतर्गत औद्योगिक संस्थांना त्यांच्या वायु उत्सर्जनाच्या प्रमाणावरून १ ते ५ तारांकन देण्यात आले आहे. यात १ तारांकन जास्त प्रदुषणकारक तर ५ तारांकन अतिशय कमी प्रदूषणकारक संस्था असे समजले जाते. MPCB वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागातील औद्योगिक संस्थांचे तारांकन पाहता येते. सर्व माहिती www.mpcb.info या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

सुरुवात महाराष्ट्रातून का?

Image may contain: one or more people, people sitting and indoor

या कार्यक्रमाशी साधर्म्य असणारे कार्यक्रम अमेरिका, कॅनडा, चीन, घाना, फिलीपिन्स आणि युक्रेन या देशातही सुरू करण्यात आले आहते. महाराष्ट्रातील कार्यक्रम हा पहीला मापदंड ठरत आहे. उत्सर्जन मोजण्याचा जो अब्दुल लतिफ, जमिल पॉवर्टी एक्शन लॅब (JPAL), एनर्जी पॉलीसी इनस्टीटयुट ॲट द युनीवर्सीटी ऑफ शिकागो (EPIC–India), एव्हीडन्स फॉर पॉलिसी डिझाइन ऑफ  हॉवर्ड युनीवर्सीटी (EPoD) आणि टाटा सेंटर फॅर डेव्हलमेंट सारख्या संशोधकांच्या मदतीने पुर्ण होत आहे.

स्टार रेटींग कार्यक्रम हा प्रदुषित औद्योगिक वायु उत्सर्जनासंदर्भात कार्य करतो. भरतातील औद्योगिकिकरणाचे माहेरघर असलेला महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी आदर्श ठरतो. राज्यातील ७५००० औद्योगिक संस्थांपैकी १२५५ संस्था संभाव्य उच्च वायु प्रदुषणकारक म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. स्टार रेटिंग कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर या संस्थांबरोबर सुरु झाला आहे. यामागे MPCB चा माहिती संग्रह वाढवणे हा देखील उद्देश आहे. 

स्टार रेटिंग कार्यक्रम का गरजेचा?

Image may contain: 10 people, people sitting, screen, laptop and indoor

वायु उत्सर्जनावरील निरीक्षणासाठी तसेच अभ्यासासाठी हा कार्यक्रम आवश्यक आहे. औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या  औद्योगिक तारांकानानुसार नमुन्यांचे प्रकटीकरण लोकांसमोर करणे हे यातील पुढचे पाउल आहे. स्टार रेटिंग कार्यक्रमामुळे उद्योगांच्या पर्यावरणीय जागरूकतेत पारदर्शकता येत आहे. हा कार्यक्रम पर्यावरणीय स्वास्थ्य वाढवण्यास तसेच संबंधीचे नियमांचे पालन करण्यास औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापकांना मदत करेल.

अधिक उत्तम कार्य करण्यासाठीचे नवीन मार्ग शोधता येतील.तसेच, समाजातील सामान्य लोकांना देखील संस्थाचे कार्य आणि क्रियाशीलता याची माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. औद्योगील वायु उत्सर्जनाच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या जनतेमध्ये या कार्यक्रमामुळे पारदर्शकता तसेचजागरूकता वाढवण्यास मदत करेल. आपल्या जिल्ह्यात कोणती कंपनी वायु प्रदूषण अधिक किंवा कमी करते या बाबतची माहिती mpcb.info या वेबसाईटवर  मिळवता येईल.