Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Vidarbha › चिखलदर्‍यात साकारणार ’स्कायवॉक’

चिखलदर्‍यात साकारणार ’स्कायवॉक’

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 9:16PMनागपूर : प्रतिनिधी

विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या चिखलदर्‍यात लवकरच रोमांचक स्कायवॉक साकारणार आहे. याकरिता ३२ कोटी ४२ लाखाची तरतूद करण्यात आली असून सिडकोने याला मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्णकरून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले..

विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. या आकर्षणात भर पाडण्याकरिता पर्यटन विकास महामंडळाने गोराघाट ते हैरीकेट पॉइंटला जोडणार्‍या दरीच्या वरून जाणारा मार्ग म्हणजे स्कायवॉक साकारल्या जाणार आहे. हा रोमांचक स्कायवॉक ४५० मीटरचा राहणार आहे. हरिद्वारच्या धर्तीवर हा स्कायवॉक चिखलदर्‍यात साकारल्या जात असून याकरिता ३२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चिखलदर्‍यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देश विदेशातील पर्यटकांकरिता स्कायवॉकप्रमुख आकर्षण ठरणार आहे..