होमपेज › Vidarbha › व्यथीत होवून आश्रम सोडत असल्याची लिहून ठवली चिठ्ठी

खामगावातील जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता

Published On: Sep 10 2018 7:59PM | Last Updated: Sep 10 2018 7:59PMबुलडाणा : प्रतिनिधी

खामगाव शहरानजिक असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकरमहाराज हे रविवार सकाळपासून बेपत्ता झाले असून महाराज आश्रम सोडून गेल्यामुळे त्यांच्या अनुयायामध्ये खळबळ उडाली आहे.शंकर महाराजांनी रविवारी सकाळी विश्‍वासूसेवक केशव पेसोडे याचेजवळ एक चिठ्ठी दिली होती व ही चिठ्ठी सोमवारी सकाळी 10 वाजेनंतर वाचावी असे सांगितले होते. मात्र याबाबत शंका आल्याने काही अनुयायांनी रविवारी रात्रीच चिठ्टी उघडून वाचली. या चिठ्ठी शंकर महाराजांनी जागृती आश्रमाशी संबंधित पाच जणांच्या नावांचा उल्लेख केला असूनत्यांच्याकडून होणारा त्रास व दबावामुळे व्यथीत होवून आश्रम सोडून जात आहे, मलाकुठही शोधू नका असे नमूद केले आहे.चिठ्ठीतील या मजकूरामुळे त्यांच्या अनुयायामध्ये खळबळ उड।ली असून महाराजांना त्रास देणा-या पाच जणाविरुध्द कारवाई करण्याची मागणी अनुयायांनी खामगांव ग्रामीण पोलीस स्टेशनकडे केली आहे.

शेलोडी येथे जागृती आश्रमाची जमीन वशिक्षण संस्था बळकावण्यासाठी महाराजांना गेल्या काही दिवसांपासून आश्रम परिवारातील काही सदस्य मानसिक त्रास देत होते.त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महाराज सजनपूरी येथील तपोवन आश्रमात राहत होते. तेथूनच ते रविवारी निघून गेले. अशी माहिती आता समोरआली आहे. या चिठ्ठीत उल्लेख केलेल्या पाच ही व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहितीउपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील वखामगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रफीक शेखयांनी दिली.

जागृती आश्रमाच्या माध्यमातून  शंकर महाराजांनी खामगांव, पिंप्राळा,शेलोडी, टेभूर्णा, बोरी अडगाव, आंबेटाकळी,लाखनवाडा या परिसरातकेलेल्या आध्यात्मिक व शैक्षणिक कार्यामुळेया परिसरात त्यांचा मोठा अनुयायी वर्गआहे. महाराजांना व्यथीत होवून आश्रम सोडून जावे लागल्याने हा अनुयायी वर्ग हळहळला आहे. महाराज सुखरुप परत यावेत यासाठ अनुयायांकडून आश्रमात हनुमान चालिसापठण व सामुहिक प्रार्थना सुरु आहे.