होमपेज › Vidarbha › लहान भावाने केलेल्या लैंगिक शोषणामुळे युवती गर्भवती

लहान भावाने केलेल्या लैंगिक शोषणामुळे युवती गर्भवती

Published On: Jan 29 2018 10:24AM | Last Updated: Jan 29 2018 10:24AMनागपूर : प्रतिनिधी

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना शांतिनगर ठाण्यांतर्गत उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. 17 वर्षीय लहान भावानेच आपल्या मोठ्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्यानंतर तिला गर्भधारणा झाली. यानंतर कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात गर्भपात केल्याने हा प्रकार उघडकीस आला. युवती परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये बी. कॉम. तृतीय वर्षाला शिकते, तर तिचा भाऊ अकरावीला आहे.

सप्टेंबर 2017 मध्ये दोघांनीही आईवडील घरी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून त्यांच्यात वारंवार असे प्रकार घडत होते. दरम्यान, युवती गर्भवती झाली. वारंवार पोट दुखत असल्यामुळे तिच्या आईने मेयो रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. आईने युवतीला कुणाचे पाप असल्याची विचारणा केली. मुलीने लहान भावाचे नाव सांगितल्यानंतर आईचे अवसान गळाले. दोघीही मायलेकी घरी गेल्या.

लहान भावाने हातून चूक झाल्याची कबुली दिली. आई-वडिलांनी गर्भपात करण्याचे ठरविले. शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. बहिणीच्या तक्रारीवरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.