Thu, Nov 15, 2018 00:02होमपेज › Vidarbha › शासकीय कर्मचार्‍यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग

शासकीय कर्मचार्‍यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग

Published On: Jul 19 2018 1:41AM | Last Updated: Jul 19 2018 1:20AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी गोड ठरणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीवर 21 हजार 530 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाचे वृत्त संकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी मुनगंटीवार यांनी आज ‘सुयोग’ निवासस्थानी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे.