Mon, Aug 26, 2019 14:45



होमपेज › Vidarbha › भरधाव एसटी घसरून पाच प्रवासी जखमी

भरधाव एसटी घसरून पाच प्रवासी जखमी

Published On: Jul 21 2019 2:33PM | Last Updated: Jul 21 2019 3:31PM




गोंदिया : प्रतिनिधी

मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरून अपघात झाला. या अपघातात पाच  प्रवासी जखमी झाले. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. राज बिसेन (वय १३, राहणार बाळापूर), समुर बिसेन (१३, डोंगरगाव), तारेंद्र रहांगडाले (१३, डोंगरगाव), हिमानी उके (१३, सुकडी) व अन्य एक असे पाच जण जखमी झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा आगाराची (एमएच-४०–९८७४) ही एसटी बस सुकडीहून तिरोड्याकडं निघाली होती. दरम्यान, मलपुरी ते गराडा रस्त्यावर चिखल झाला होता. ओल्या मातीमुळे भरधाव एसटी रस्त्यावरून घसरू लागली. चालकाने वेळीच नियंत्रण करत बस रस्त्याच्या कडेला नेत असताना उलटली. यात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. यावेळी एसटीत सुमारे ३५ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान या अपघाताबाबत एसटी आगाराला माहिती देण्यात आली, मात्र २ तास झाले तरी मदतीसाठी वाहन आले नाही. यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.