Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Vidarbha › पोलिसांच्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांचे जबर नुकसान

पोलिसांच्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांचे जबर नुकसान

Published On: Dec 08 2017 1:44AM | Last Updated: Dec 07 2017 7:59PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात निर्दोष नागरिकांना ठार मारणार्‍या नक्षलवाद्यांना बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. गडचिरोलीच्या नक्षलविरोधी अभियानाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे यश आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एसएलआर, दोन आठ एमएम रायफली, दोन बारा बोअर बंदुका, एक बारा बोअर कट्टा, यासह माओवादी पत्रके व साहित्य जप्त केले आहे, असे शरद शेलार म्हणाले. पत्रपरिषदेला पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक राजा, डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्यासह महेंद्र पंडित उपस्थित होते.

सिरोंचा तालुका हा छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेला लागून आहे. छत्तीसगडच्या अतिसंवेदनशील बिजापूर जिल्ह्याची सीमा या तालुक्याला लागून आहे. पातागुडम ते झिंगानूरपर्यंतचा भाग नक्षलवादी कारवायासाठी अतिसंवेदनशील आहे. देचलीपेठा ते झिंगानूर दरम्यानच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचाली अलीकडच्या काळात वाढल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यात 1980च्या दशकात पीपल्स वॉर ग्रुपच्या कारवाया सुरू झाल्या. 2004मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनाच्या एकत्रीकणानंतर माओवादी संघटना अस्तित्वात आली. या नक्षलवादी संघटनेची आक्रमकता गोविंदगावच्या चकमकीपासून कमी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.