Thu, Mar 21, 2019 15:31होमपेज › Vidarbha › सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता

सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:55PMनागपूर ः प्रतिनिधी

शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी 13 कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. यात यवतमाळ, धुळे, वर्धा, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांना सुधारण्याची एक संधी दिली जाते. शिक्षेच्या काळात गुन्हेगाराचे वर्तन बघून त्याला खुल्या कारागृहात हलविले जाते. या खुल्या कारागृहात कैद्याकडून विविध स्वरूपाचे व्यवसाय व दैनंदिन काम करून घेतले जाते. रात्रंदिवस कारागृहाच्या दगडी भिंतीत राहण्याऐवजी शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांच्या वर्तनावरून मोकळ्या जागेत काम दिले जाते. यातून अनेक सकारात्मक परिणाम पुढे आले आहे.

सध्या राज्यात 13 खुले कारागृह आहे. आता गृह विभागाने सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता दिली आहे. यात यवतमाळ, धुळे, वर्धा, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. बहुतांश कारागृहाकडे स्वत:ची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर बंद्यांना मजुरीचे काम दिले जाते. काही कारागृहात उद्योगही उभारण्यात आले आहे. या उद्योगांमध्ये कामगार म्हणून त्यांचा वापर केला जातो. खुल्या कारागृहातून शासनाला दुहेरी उद्देश साध्य करता येतो. कैद्याकडून कामही करून घेतले जाते. त्यातून प्रशासनाला आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय खुल्या वातावरणात गुन्हेगाराचे मत परिवर्तन करण्यात यश प्राप्त होते. कैदी शिक्षा पूर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर तो एक सामान्य नागरिक म्हणून जीवन जगू शकतो.