होमपेज › Vidarbha › राजगुरू संघ स्वयंसेवक नव्हते : मा. गो. वैद्य

राजगुरू संघ स्वयंसेवक नव्हते : मा. गो. वैद्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

महान क्रांतिकारक राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कधीही स्वयंसेवक नव्हते, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्‍ते मा.गो. वैद्य यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे संघाचे माजी प्रचारक
नरेंद्र सेहगल यांच्या दाव्यातून हवा निघून गेली.

शहीद राजगुरू हे नागपूरच्या मोहितेवाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावा करीत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, असा दावा संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सेहगल यांनी ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकात केला
होता. त्यांचा हा दावा मा.गो. वैद्य यांनी खोडून काढला. राजगुरू यांचा संघाशी संबंध असल्याचे आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. डॉ. हेडगेवार हे स्वत: क्रांतिकारी होते, त्यामुळे त्यांनी राजगुरू कधी आले असतील
तर राहायची व्यवस्था केली असू शकते; पण ते स्वयंसेवक असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचेही मा. गो. वैद्य यांनी स्पष्ट केले.

Tags : RSS, Rajguru, Sehgal, Vaidya
 


  •