Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Vidarbha › सीआरझेडची मर्यादा ५० मीटर करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव

सीआरझेडची मर्यादा ५० मीटर करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव

Published On: Dec 22 2017 6:21AM | Last Updated: Dec 22 2017 1:25AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

सीआरझेडची मर्यादा 50 मीटर अंतरापर्यंत आणावी, या मागणीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. ओखी वादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर कदम यांनी ही माहिती दिली. 

मुंबई शहर व पश्‍चिम उपनगरातील समुद्र किनार्‍यालगतचा 500 मीटर भागाचा विकास खुटला होता. पण राज्य सरकारने सीआरझेडची रेषा 500 मीटरवरून 200 मीटर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुलाबासह गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, माहीम, बांद्रा, खार, जुहू, सातबंगला, वेसावे, मढ, मार्वे, गोराई समुद्रकिनार्‍या लगतच्या  सुमारे 1 हजार 300 जुन्या इमारतींसह  झोपडपट्टीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. पण कुलाबा,

वेसावे, वरळी, गोराई कोळीवाड्याच्या विकासाचा प्रश्‍न जैसे थे राहणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. कारण कोळीवाडे 200 मीटरच्या आतच आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव कोळीवाड्यांसाठी गुड न्यूज ठरणार आहे.