Thu, Nov 15, 2018 15:52होमपेज › Vidarbha › पोलिसांसाठी २० हजार घरांचा आराखडा तयार

पोलिसांसाठी २० हजार घरांचा आराखडा तयार

Published On: Jul 17 2018 1:37AM | Last Updated: Jul 16 2018 11:58PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासात सध्या 20 हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या भागात घरे मोडकळीस आली आहेत, अशा ठिकाणी तो प्रामुख्याने राबविण्यात येणार आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

ते म्हणाले, पोलिस कर्मचार्‍यांना घरासाठी कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून 208 कोटी रुपयांचे व्याज अनुदान देण्यात आले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेमध्ये पोलिसांच्या घरांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबईसह राज्यात ज्या भागात पोलिस वसाहती मोडकळीस आल्या आहेत, तेथे नवीन वसाहत तयार करण्याबाबत आराखडा तयार करण्यात येत आहे. पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी जमीन आणि वाढीव चटई क्षेत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले.